औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी पहिल्यांदाच हे काय केले!

Foto

औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात सार्वत्रीक लोकसभा निवडणुक २०१९ बंदोबस्त काळात बाहेरील जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड बंदोबस्तासाठी आलेले आहेत. तसेच सी.आर.पी.एफ, सी.आय.एस.एफ व एस.आर.पी.एफ तसेच मध्यप्रदेश राखीव पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी असे सुमारे दोन हजार पाचशे पोलीस अधिकारी,कर्मचारी व होमगार्ड ही बंदोबस्त साठी आलेले आहेत. तसेच जिल्ह्यातील दोन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त साठी नेमलेले आहेत. औरंगाबाद ग्रामीण  पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पणेतुन लोकसभा निवडणुकी करीता नेमण्यात आलेल्या बाहेरील व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचे दिवशी बंदोबस्त करणे सुकर व्हावे या करीता अल्पोपहार म्हणुन २०० ग्रॅम चिक्की पॅकेट, एक चिवडा पॅकेट, दोन ओ.आर.एस. पॅकेट, तसेच एक लिटर पाणी बॉटल असे लोकसभा निवडणुकीकरीता आलेले सुमारे ४७00.अधिकारी व कर्मचारी यांना फूट पॅकेट वाटप करण्यात आले. 

हा उपक्रम मोक्षदा पाटील यांच्या संकल्पणेतुन राबविण्यात आला असून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कल्याणासाठी प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला आहे. यावर्षी तिव्र उन्हामुळे अधिकारी कर्मचारी यांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणुन ओ.आर.एस.ची दोन पॅकेट प्रत्येकाला देण्यात आले आहेत.तसेच बंदोबस्त कामी बाहेरुन आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी, सी.आर.पी.एफ. एस.आर.पी.एफ. सी.आय.एस.एफ. व होमगार्ड यांचे राहण्याची, नास्ता तसेच दोन वेळेच्या जेवणाची सोय पैठण, गंगापुर, वैजापुर, सिल्लोड, कन्नड या उपविभागीय स्तरावर करण्यात आली असून त्यांना संबधीत अधिकारी मदत करीत आहेत. मोक्षदा पाटील यांनी प्रत्येक उपविभागीय स्तरावर जातीने भेट देवून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची राहण्याची जागा तसेच जेवनाची सोय याबाबत कोणतीही उणीव राहणार नाही याबाबत खात्री केली आहे. तसेच पोलीस मुख्यालय येथील कैलास शिल्प येथेही भेट देवून बाहेरुन आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची समक्ष भेट घेऊन विचारपस केलेली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच पोलिसांना बंदोबस्तावर अशा प्रकारचा अल्प आहार व जेवणाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे बंदोबस्तावर असलेल्या व बाहेरून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.